आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात 'या' विक्रमांची नोंद
आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात 'या' विक्रमांची नोंद
img
दैनिक भ्रमर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात  एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या हंगामातील 30 वा सामना खेळला गेला. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. 

हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनेही 6 गडी गमावून 262 धावा केल्या. हा सामना अवघ्या 25 धावांनी जिंकण्यात हैदराबादला यश आले. या सामन्यात अनेक विक्रम झाले. या हंगामात सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. त्याने आरसीबीविरुद्ध 3 गडी बाद 287 धावा केल्या. आयपीएलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक 549 धावा झाल्या. याआधी हा विक्रम हैदराबाद आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यात 523 धावा झाल्या होत्या. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 81 चौकार मारले गेले. या सामन्यात 43 चौकार आणि 38 षटकार दिसले. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे.

राज्यातील ५ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं ; बळीराजा हवालदिल

सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हैदराबादच्या नावावर

आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. हैदराबादने बंगळुरूविरुद्ध एका डावात 22 षटकार मारले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या कालच्या सामन्यात एकूण 38 षटकार मारले गेले. हैदराबादने 22 षटकार तर बंगळुरूने 16 षटकार मारले. दुसऱ्यांदा टी-20 सामन्यात 38 षटकार ठोकले आहेत. सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमधील चौथे जलद शतक झळकावले. त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.


शेवटच्या 5 षटकात 82 धावा

हैदराबादने पहिल्या 10 षटकांत 128 धावा केल्या होत्या आणि पुढच्या 10 षटकांतही धावगती कमी झाली नाही. खरे तर 11व्या षटकानंतर असे एकही षटक नाही ज्यात 10 पेक्षा कमी धावा झाल्या असतील. हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्माने 22 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. शेवटी एडन मार्कराम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. एकीकडे मार्करामने 17 चेंडूत 32 धावा केल्या तर अब्दुल समदने 10 चेंडूत 37 धावांची झंझावाती खेळी करत एसआरएचने शेवटच्या 5 षटकात 82 धावा केल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group