क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर : वर्ल्ड कप २०२३ची तिकिटे पुन्हा मिळणार, यादिवशी सुरू होणार विक्री
क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर : वर्ल्ड कप २०२३ची तिकिटे पुन्हा मिळणार, यादिवशी सुरू होणार विक्री
img
Dipali Ghadwaje
सर्वांना वेध लागलेल्या वनडे विश्वचषक २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात  होणार आहे.विश्वचषक 2023 सुरू होण्यास आता फक्त  एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषकासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यामुळेच तिकीट मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. 

मात्र केवळ काही लोकांनाच या सामन्यांची तिकिटे उपलब्ध होऊ शकली आहेत, त्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआयला टीकेला सामोरे जावे लागले आहे. चाहत्यांच्या सततच्या तक्रारींनंतर, बीसीसीआयने तिकीट विक्रीची दुसरी फेरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.

चाहत्यांमधील तिकिटे न मिळाल्याची निराशा पाहत आता बीसीसीआयने आणखी ४ लाख तिकिटे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बोर्डाने बुधवार, ६ सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की तिकीट विक्रीची दुसरी फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांशी बोलून ही ४ लाख तिकिटे विकण्याचे मान्य करण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. दरम्यान ५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठीची अजून काही तिकिटे उपलब्ध करणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले की ते भारतात होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी सुमारे ४ लाख तिकिटे जारी करणार आहेत. भारताला १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने तिकिटांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच विश्वचषकाची सर्व तिकिटे विकली गेल्याने मैदानावरील सामन्यांची थेट झलक पाहण्याची आशा असलेल्या अनेक चाहत्यांची निराशा झाली आहे. पण आता बीसीसीआयने तिकीट विक्रीची दुसरी फेरी सुरू करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

कधी होणार तिकिटांची विक्री

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या सर्व सामन्यांच्या तिकिटांची सामान्य विक्री ८ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल. चाहते अधिकृत तिकीट वेबसाइट https://tickets.cricketworldcup.com ला भेट देऊन तिकीट खरेदी करू शकता. पुढील टप्प्याबाबत पुढील तिकीट विक्रीबाबत चाहत्यांना योग्य वेळी माहिती दिली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group