आज 9 जुलै बुधवार रोजी सर्व राशींवर ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव पडणार आहे. काही राशींची आज अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. तर आजच्या दिवशी काही राशीना गाडी जपून चालवण्याचा सल्ला दिला जातोय. तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य...
मेष - अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल
नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामाची जास्त काळजी कराल. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. तुमचा कोणताही कायदेशीर वाद प्रलंबित असेल तर त्यात चांगली बातमी मिळू शकते.
आज तुमचे भाग्य ६२% तुमच्या बाजूने असेल. पार्वती किंवा उमा देवीची पूजा करा.
वृषभ - वाहन जपून चालवा
आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला-वाईट असा असेल. अचानक धनलाभामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला ऐकून तुम्ही चांगले नाव कमवाल. व्यवसायात कोणाशीही समझोता करू नका. प्रवासाला जात असाल तर वाहन जपून चालवा. अपघाताची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आज तुमचे भाग्य ७७% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूंच्या १०८ माळा जपा.
मिथुन - आई-वडिलांशी वाद होऊ शकतो
आज तुमच्यात पराक्रम वाढेल. ऑफिसमध्ये मोठी कामगिरी केल्याने तुम्ही खुश असाल. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या नादात संधी गमावू नये. अन्यथा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन मधुर राहील. बौद्धिक क्षमता मजबूत होईल. एखाद्या गोष्टीवरून आई-वडिलांशी वाद होऊ शकतो. मोठ्यांचे बोलणे ऐकणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमचे भाग्य ६४% तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा.
कर्क - पैशांच्या व्यवहारात सावधान राहा
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मेहनत करण्याचा आहे. नोकरी करणारे लोक चांगले काम करून अधिकाऱ्यांची मने जिंकतील. तुम्ही आपल्या बोलण्याने आणि वागण्याने सर्वांना एकत्र ठेवू शकाल. पैशांच्या व्यवहारात सावधान राहा, कोणीतरी तुम्हाला फसवू शकते. जास्त नफ्याच्या लोभात जास्त पैसे गुंतवू नका. अन्यथा, चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले जाऊ शकतात. आईच्या बाजूने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमचे भाग्य ६६% तुमच्या बाजूने असेल. गरीब लोकांना जेवण द्या.
सिंह - मोठी गुंतवणूक करू नये
आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. ऑफिसमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही कोणतेही काम ज्युनियरच्या हातात द्याल तर मोठी गडबड होऊ शकते. प्रेमजीवन जगणाऱ्यांनी पार्टनरच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करू नये नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. वेळेवर काम पूर्ण करा. तुमच्या दिनचर्येत बदल केल्याने त्रास होऊ शकतो. आज तुमचे भाग्य ८७% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा तिलक लावा.
कन्या - आर्थिक स्थिती सुधारेल
आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे टाळा. अन्यथा वाद होऊ शकतात. अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. मोठ्या माणसांनी कोणतेही काम सांगितले तर ते वेळेवर पूर्ण करा. तुमची जुनी चूक लोकांसमोर येऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या कामामुळे त्रस्त असतील तर त्यांना आराम मिळेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुमचे भाग्य ९०% तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या रेशमी कपड्यांचे दान करा.
तूळ - प्रमोशन मिळू शकते
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्यात पराक्रम वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते, ज्यामुळे ते आनंदी होतील. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. मालमत्तेसंबंधी कोणताही वाद चालू असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळेल. तुमचे टॅलेंट लोकांसमोर येईल आणि ते पाहून लोक चकित होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. आज तुमचे भाग्य ८८% तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या आणि तेल वहा.
वृश्चिक - मने जिंकण्यात यशस्वी व्हाल
आजचा दिवस तुमच्यासाठी लकी आहे. कुटुंबातील लोकांचा सल्ला उपयोगी ठरेल. तुम्ही आपल्या जवळच्या लोकांशी संबंध वाढवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्याचे बोलणे तुम्हाला वाईट वाटू शकते. तुम्ही सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. जीवनसाथीसोबत काही प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक गोष्टीत बाहेरील व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. आज तुमचे भाग्य ६५% तुमच्या बाजूने असेल. गरजूंना मदत करा.
धनु - ओळखींमुळे फायदा होईल
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. नवीन ओळखींमुळे फायदा होईल. रक्ताचे संबंध मजबूत होतील. रचनात्मक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना सुरू करू शकता. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण राहील. तुम्हाला एका मागोमाग चांगल्या बातम्या मिळतील. आज तुमचे भाग्य ९१% तुमच्या बाजूने असेल. माता उमाची पूजा करा.
मकर - धार्मिक कार्यात रुची वाढेल
आजचा दिवस महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कोणतेही काम घाईत करू नका. जबाबदारीने काम करणे चांगले राहील. ऑफिसमध्ये शत्रूंपासून सावध राहा. ते तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. गुंतवणुकीच्या काही योजना थांबण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक तणावातून आराम मिळेल. आज तुमचे भाग्य ७२% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूंचा नैवेद्य दाखवा.
कुंभ - मन प्रसन्न राहील
आर्थिक दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. मोठी कामगिरी केल्याने मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्यात स्वाभिमानाची भावना टिकून राहील. बराच काळ रखडलेले पैसे मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक कामे चांगली होतील. आज तुमचे भाग्य ९३% तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
मीन - नफा मिळू शकतो
आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. व्यवसायात मंदीमुळे त्रस्त असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद कोर्टात चालू असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्याल. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यासमोर कोणताही वादग्रस्त प्रसंग आला, तर दूर राहणे चांगले राहील. आज तुमचे भाग्य ९८% तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामाचा अभ्यास करा.