मोठी बातमी : अशोक चव्हाणांना धक्का, भाजपचे मोठे नेते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
मोठी बातमी : अशोक चव्हाणांना धक्का, भाजपचे मोठे नेते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत परभवानंतर भाजपामध्ये गळती सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीतून भाजपमध्ये गेलेले अनेक बड़े नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे दाजी तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील भाजपची साथ सोडण्याचा निश्चय केला आहे.

येत्या 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे ते काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्यासोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई ह्या देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खतगांवकर यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना खासदारकीही मिळाली. त्यांच्यापाठोपाठ भास्करराव पाटील खतगावरकर हेदेखील भाजपमध्ये सामील झाले. पण गेल्या काही दिवसांसून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई आणि दोन माजी आमदारदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. हा पक्षप्रवेश झाल्यास नांदेड दक्षिण मधून ओमप्रकाश पोकर्णा यांना आणि देगलूर विधानसभा मतदार संघातून अविनाश घाटे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते, अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण काँग्रेसची साथ सोडल्यानंतर काही दिवसातच त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. पण त्यांच्यासोबत गेलेल्या भास्करराव खतगावकरांना भाजपकडून कोणतीच संधी मिळाली नाही. त्यामुळेते भाजपमध्ये नाराज असल्याचीही चर्चा आहे.
 
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी मोठा विजय मिळवला. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच नायगाव लोकसभेची निवडणुकही लागण्याची शक्यता असल्याने हीच संधी साधून भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान भास्करराव खतगावकर हे अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आहेत. पण येत्या 15 सप्टेंबरला ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात त्यांच्यासोबत सुनबाई मीनल खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हेदेखील काँग्रेसमध्येप्रवेश करण्याची शक्यता आहे. हा पक्षप्रवेश झाला तर  हा अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group