कार आणि ट्रकचा भीषण अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू
कार आणि ट्रकचा भीषण अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. अशातच यवतमाळमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,यवतमाळच्या चापरडा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिसांकडून सुरू आहे. यवतमाळ -नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले सर्वजण पंजाबमधील आहेत. पंजाब येथील शीख कुटुंब नांदेड येथे दर्शनसाठी जात होते. यवतमाळमार्गे ते नांदेडला जात असताना भीषण अपघात झाला.चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group