धक्कादायक : मध्यान्न भोजनातून १६ शाळकरी मुलांना विषबाधा
धक्कादायक : मध्यान्न भोजनातून १६ शाळकरी मुलांना विषबाधा
img
Dipali Ghadwaje
चेंबूरच्या आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मिड डे मिलमुळे शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत देण्यात आलेली डाळ आणि खिचडी खाऊन १६ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली  सविस्तर माहिती अशी की, चेंबूरच्या आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मध्यान्न भोजनातून शाळकरी मुलांना जेवणामध्ये डाळ आणि खिचडी देण्यात आली होती. त्यातून या मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

दरम्यान खिचडी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ सुरू झाली. त्रास जाणवू लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एकूण १८० मुलांना हे मध्यान्न भोजन देण्यात आले होते. यामधील सहावी आणि सातवीतील १६ मुलांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
school |
इतर बातम्या
Join Whatsapp Group