बिटको कॉलेजमध्ये महिला प्राचार्यांसह विद्यार्थ्याला बापलेकाकडून मारहाण
बिटको कॉलेजमध्ये महिला प्राचार्यांसह विद्यार्थ्याला बापलेकाकडून मारहाण
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दोन विद्यार्थ्यांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या प्राचार्यांसह एका विद्यार्थ्यास आरोपी बापलेकाने बेसबॉल स्टीक व लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना बिटको कॉलेजमध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी नितीन कैलास देवडे (वय 38, रा. सुवर्णा सोसायटी, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) हे काल (दि. 22) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास बिटको कॉलेज येथे ड्युटीवर होते.

त्यावेळी कॉलेजच्या एका क्लासरूमच्या दिशेने जोरात ओरडण्याचा आवाज आला. म्हणून देवडे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे मयूर बोराडे व अभयसिंग चौहान यांच्यात भांडण सुरू होते. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादी यांनी या दोघांना प्राचार्यांच्या कार्यालयात नेले असता तेथे आरोपी मयूर बोराडे,

त्याचे वडील विजय बोराडे व अन्य एक अनोळखी इसम यांनी प्राचार्या यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या हातातील बेसबॉल स्टिक व लाकडी दांडक्याने शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादी देवडे व शाळेचा विद्यार्थी अभयसिंग चौहान यांना मारून जखमी केले, तसेच प्राचार्या डॉ. मंजूषा मुकुंद कुलकर्णी यांनाही मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बापलेकासह अन्य एका इसमासह गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group