अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट मिळणार ! दिवाळीचा बोनस लवकरच येणार
अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट मिळणार ! दिवाळीचा बोनस लवकरच येणार
img
दैनिक भ्रमर
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच भाऊबीजेचं गिफ्ट मिळणार आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी बोनस जाहीर केला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा दिवाळी गोड होईल असे म्हटले जात आहे. 

राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. ही भेट दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँकेतील  खात्यांमध्ये जमा होणार आहे. यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असे महिला आणि बाल कल्याण आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दिवाळीआधी बोनस दिला जाणार असल्याची शक्यता होती. 

बोनस कधी मिळणार हे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. अनेकदा दिवाळीनंतर ही बोनसची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा होत असते. पण नवरात्र उत्सव काळात त्याला मान्यता घेऊन दिवाळीपूर्वीच बोनस बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group