देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, 'अटल सेतू'चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल, 'अटल सेतू'चे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन आज पार पाडले. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडी-न्हावा शेवा असा प्रवास केला. 

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. शिवडीहून न्हावा शेवा अवघ्या काही मिनिटात गाठणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे हा अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे.  मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला झाला. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.  

 कसा आहे पूल? 
  • MTHL पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.
  • या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
  • मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई येथे SH-54 आणि NH-348 वर चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
  • 90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत. 
  • या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. 
  • मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे. 
  • इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल. 
  • ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता

अटल सेतूवरील टोल दर किती?  

वाहन प्रकार
एकेरी प्रवास 
परतीचा प्रवास
दैनंदिन पास
मासिक पास
कार
250 रुपये
375 रुपये
625 रुपये
12,500 रुपये
एलसीव्ही/ मिनी बस
400 रुपये
600 रुपये
1000 रुपये
20,000 रुपये
बस/ 2 एक्सल ट्रक
830 रुपये
1245 रुपये
2075 रुपये
41, 500 रुपये
एमएव्ही 3 एक्सल वाहनं
905 रुपये
1360 रुपये
2265 रुपये
45, 250 रुपये
एमएव्ही 4 ते 6 एक्सल
1300 रुपये
1950 रुपये
3250 रुपये
65, 000 रुपये
मल्टीएक्सल वाहने 
1580 रुपये
2370 रुपये 
3950 रुपये
79, 000 रुपये


 


इतर बातम्या
Join Whatsapp Group