दुर्दैेवी...! विजेची तार पाण्यात गेली, अन्......; महिलेसोबत काय घडले वाचा....
दुर्दैेवी...! विजेची तार पाण्यात गेली, अन्......; महिलेसोबत काय घडले वाचा....
img
Dipali Ghadwaje
पुणे : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात ठिकाठिकाणी जोरदार पाऊस बरसला या जोरदार झालेल्या पावसामुळे पुण्यात पूर आला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. आता याच पावसाने एका महिलेचा करुण अंत झाला आहे. विद्युत वायरचा शॉक लागून या महिलेचा मृत्यू झालयाची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून मृत महिलेचे वय 40 वर्षे आहे. पाण्यात विद्यात प्रवाह पसरला, महिलेला नव्हती कल्पना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला होती.

नेमकं काय घडले?

काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली होती होती. मात्र या परिसरात अशलेल्या डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आल्या होत्या. परिणामी संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. याची मृत महिलेला कल्पना नव्हती. परिणामी घराबाहेर आल्यानंतर पाण्यातील तारा महिलेला दिसल्या नाहीत. या तारांचा स्पर्श महिलेला झाला. परिणामी विद्युत तारांच्या झटक्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group