बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र्य आरक्षण मंजूर केलं. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षणाचे हिरो जरांगे पाटील आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला, आंदोलनाला जा पोस्ट करा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मराठा आरक्षणाचे हिरो जरांगे पाटील आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला, आंदोलनाला जा पोस्ट करा त्याला कोन नाही म्हणाले. जरांगे पाटील यांचे त्याग बलिदान कष्ट याविषयी आदर आहे. असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
त्या बीडच्या नेकनूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या. पहिल्यांदा मराठा समाजाला भाजपनं आरक्षण दिलं असंही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जर जूनपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आपण विधानसभेच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला आहे. यावेळी पाडणारे बना, आपल्या मुला बाळाचा चेहरा समोर ठेवून मतदान करा, पुढच्या वेळेस आरक्षण देणारे बनवू असं आवाहनही अनेकदा जरांगे पाटील यांनी केलं आहे.