येवल्यात भुजबळांकडून जरांगे यांना
येवल्यात भुजबळांकडून जरांगे यांना "हे" प्रत्युत्तर, तर पंकजा मुंडे यांनाही दिला "हा" सल्ला
img
दैनिक भ्रमर

येवला (दीपक सोनवणे) :- नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यात काल पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली होती.

प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून लढायला सांगेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला. ते म्हणाले, की बीडची निवडणूक जवळ आली आहे. पंकजा मुंडे यांनी नाशिकची काळजी न करता बीडमध्ये लक्ष घालावे.

नाशिकमध्ये उमेदवारांची कमी नाहा. दरम्यान, मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली होती, की मराठा समाजाला घाबरून भुजबळांनी माघार घेतली. यावरही भुजबळांनी जरांगे यांना सडेतोड उत्तर दिले. "मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरून माघार घेतली नाही,” असे पुनरुच्चार त्यांनी केले. ओबीसी समाजासोबतच मराठा समाजही माझ्यासोबत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group