दिवाळीत नागरिकांना मोठं गिफ्ट मिळेल, अशी घोषणा १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरम्यान, त्याआधीच सरकारने खुशखबर दिली आहे. आता नवरात्रीआधीच नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. दरम्यान, कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार, यामधून सर्वसामान्य नागरिकांना किती फायदा होणार ते जाणून घेऊया.
दूध-पनीरवर शून्य टक्के जीएसटी - दूध, पनीरवर शून्य टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींवर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार आहे.
तूपही स्वस्त होणार - डेअरी प्रोडक्ट्सच्या किंमती स्वस्त होणार आहेत. तूप आणि बटरवरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आला आहे. याआधी हा दर १२ टक्के होता.
बिस्कीटांवरील टॅक्स कमी - नमकीन- बिस्कीटांवरील टॅक्स ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे तर ५ रुपयांच्या बिस्कीटावर टॅक्स ६० पैसे टॅक्स लागत होता. तर त्यावर आता १५ पैसे टॅक्स लागणार आहे.
चॉकलेट- मिठाईंवरील टॅक्स कमी - चॉकलेट- मिठाईंवरील टॅक्सदेखील कमी करण्यात आला आहे. यावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.
पिझ्झा-ब्रेडवर ५ टक्के जीएसटी - फूड प्रोडक्ट्समध्ये पिझ्झा- ब्रेडवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. यावर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.
तेल शॅम्पूवरील टॅक्स कमी - सरकारने तेल आणि शॅम्पूवरील कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला आहे.
कपड्यांवरील टॅक्स कमी - कपड्यांवरील टॅक्सदेखील कमी करण्यात आला आहे. २५०० रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर म्हणजेच साडी, शर्ट, ट्राउजरवरील जीएसटी दर ५ टक्के करण्यात आले आहे.
शूजवरील टॅक्स कमी - २५०० रुपयांपर्यंतच्या सर्व चप्पलांवर आणि शूजवरील टॅक्स कमी केला आहे. यावर आधी १२ टक्के जीएसटी होता. तो आता ५ टक्के करण्यात आले आहे. आधी २००० रुपयांच्या शूजवर २४० रुपये टॅक्स लागत होता हा आता फक्त १४० रुपये लागणार होता.
शिक्षणासंबंधित वस्तूंवरील टॅक्स - सरकारने शिक्षणासंबंधित वस्तूंवरील टॅक्स कमी केला आहे. यामध्ये वह्या, पुस्तके, पेन्सिल, रबर, कटर या वस्तूंवरील टॅक्स रद्द करण्यात आला आहे. यावर आधी १२ टक्के जीएसटी लागू होत होता.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू - एसी, टीव्हीपासून ते वॉटर हिटर या गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. एसीवरील टॅक्स २८ टक्क्यांवरुन १८ टक्के करण्यात आला आहे. तर डिशवॉशर, मॉनिटर, प्रोजेक्टरवरील टॅक्स १२ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.
चपाती, कपडे आणि घरांच्या किंमती कमी होणार - जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर निर्मला सितारामन यांनी सांगितले की, टॅक्स स्लॅबमधील बदल सर्वसामान्य नागरिक ते शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन करण्यात आले आहेत.याबाबत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टीव्ही, फ्रिज, पॉवरबँक, मोबाईल, चार्जर, कूलर यांच्यावरील टॅक्स कमी करण्यात आला आहे. तसेच घरात उपयोगी वस्तू चपातीपासून ते कपड्यावरील टॅक्स कमी केला जाणार आहे.