जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन  २ लाख कोटींच्या पुढे
जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन २ लाख कोटींच्या पुढे
img
दैनिक भ्रमर
देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाच्या आकडेवारीने सर्व विक्रम मोडले आहेत आणि सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये झाले आहे. यावेळी जीएसटी संकलनातून मोठा महसूल मिळाला असून सरकारची तिजोरी भरली आहे.


एका महिन्यात प्रथमच GST महसूल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये होते, जे ऐतिहासिक संकलन आहे. स्थूल महसुलात वर्ष-दर-वर्ष आधारावर 12.4 टक्के वाढ झाली आहे. परताव्यानंतरचा निव्वळ महसूल पाहिल्यास, तो 1.92 लाख कोटी रुपये आहे, जो वार्षिक आधारावर 17.1 टक्क्यांनी वाढला आहे.
GST |
इतर बातम्या
Join Whatsapp Group