नामांकित स्टील कंपन्यांवर GST विभागाची धाड; व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ
नामांकित स्टील कंपन्यांवर GST विभागाची धाड; व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ
img
Dipali Ghadwaje
मागील काही महिन्यांपासून जालना शहरातील व्यापारी कधी आयकर, तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत. अशातच एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन नामांकित स्टील कंपन्यावर जीएसटी पथकाने धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दोन नामांकित कंपन्याकडून लोखंड निर्मितीसाठी भंगाराची खरेदी करण्यात आली होती. मात्र, भंगार खरेदीचा व्यवहार न दाखवता या कंपन्याकडून GST चुकवण्यात आल्याची माहिती सामोरं आली आहे.  गुरुवारी (१८ जानेवारी) पहाटेच्या सुमारास जीएसटी पथकाने जालना शहरात धाडी टाकल्याची माहिती आहे.  

सध्या GST विभागाच्या पथकाकडून या दोन कंपन्याच्या कागदपत्राची तपासणी सुरू असून संपूर्ण अकाऊंट विभागाची कागद कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नागपूर जीएसटी पथकातील 10 ते 12 जणांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

गुजरात आणि राज्यातील इतर भागातील भंगार व्यवसयिक यांच्याकडून मिळालेल्या बोगस बिलाच्या पावत्या वरून GST विभागाकडून ही कारवाई सुरु असल्याची माहिती सामोरं आली आहे. जीएसटी विभागाने मारलेल्या अचानक धाडीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे.
 
crime | GST |
इतर बातम्या
Join Whatsapp Group