सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट...! दैनंदिन जीवनात लागणाऱ्या
सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट...! दैनंदिन जीवनात लागणाऱ्या
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकार लवकरच सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत १२ टक्के टॅक्सचा स्लॅब रद्द केला जाऊ शकतो. सरकारच्या निर्णयामुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू स्वस्त होण्याची मोठी शक्यता आहे. यामध्ये दूध, दही पनीर, कपडे याचा समावेश आहे.

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या काही वस्तूंचा १८ टक्के जीएसटी स्लॅबच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो. तर दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश केला जाऊ शकतो. सरकराने १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केल्यास अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात. 

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या आवश्यक वस्तूंची यादी लोणी, तूप, प्रक्रिया केलेले पदार्थ, बदाम, मोबाईल, फळांचा रस, भाज्या, फळे, लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, नारळ पाणी, छत्री, १००० रुपयांहून अधिक किंमतीचे कपडे, १००० रुपयांपर्यंतचे बुट इत्यादी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

१२ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या सेवा 

हॉटेल रुम, (प्रति रात्र भाडे ७५०० रुपयांपर्यंत),नॉन इकोनॉमिक क्लास (हवाई प्रवास) , काही मल्टिमॉडल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आणि कमर्शियल सेवा इत्यादी सेवांचा समावेश आहे. १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केल्यानंतर त्यातील दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश हा ५ टक्के टॅक्स स्लॅबच्या यादीत केला जाऊ शकतो. तर इतर वस्तूंचा समावेश हा १८ टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समावेश करण्याचा विचार सूरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात येणार आहे.

सध्या भारतात जीएसटीचे ४ प्रकारचे जीएसटी स्लॅब आहेत. ५ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू कमी आहेत. त्यानंतर १२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे. १८ टक्के आणि २४ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब कायम असणार आहे. सध्या महागाई कमी करण्यासाठी सरकारने १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे .
इतर बातम्या
Join Whatsapp Group