नारायण राणे म्हणाले, मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…
नारायण राणे म्हणाले, मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…
img
वैष्णवी सांगळे
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवली येथील कार्यक्रमात बोलताना विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले आहे. यावेळी त्यांनी एक धक्कादायक किस्साही सांगितला आहे. 



नारायण राणे यांनी यावेळी कार्यक्रमात बोलताना एक जुना किस्सा सांगताना ते म्हणाले, मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला समजवलं म्हणून मी खून केला नाही.’ मात्र ही कधीची गोष्ट आहे याबाबत माहिती समोर आलेली. आजच्या भाषणात नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचेही संकेत दिले आहेत.

नारायण राणेंनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटले की, ‘मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी लोकसेभवर जाण्याआधी सुद्धा मला तिकीट नको अस सांगितलं होत. मात्र नड्डा यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला राजकारणातून सोडणार नाही. मी घमेंडखोर आहे, मी कोणापेक्षा कमी आहे अस कधीच मानत नाही. मला त्याचा अभिमान वाटतो. मात्र आता कुठेतरी थांबायला पाहिजे. राणेंना संपवायला निघाले त्यांना सांगतो, राणे पुरून उरला आहे. माझी रास गुरू आहे. ती स्ट्राँग आहे. मी कार्यकर्त्यांना सांगायला आलो आहे की राणे संपणार नाही. कुटुंब म्हणून राणे कुटुंब एकत्र राहणार आहोत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group