मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा हा चौथा कोकण दौरा आहे.
दरम्यान रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाच्या भुमीपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिवसेनेतल्या फुटीनंतर आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांनी केलेले दौरे आणि आता एकनाथ शिंदेंचे दौरे यावरून राजकीयदृष्ट्या आगामी काळात कोकणाचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित होतं असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवाय मुंबईतल्या राजकारणावर देखील कोकणी माणसाचा प्रभाव आहे. त्यामुळे आता शिंदेंमार्फत महायुती कोकणात आपला प्रचार करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.