धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची ... मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले ?
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची ... मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले ?
img
वैष्णवी सांगळे
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची माझ्या जवळ २२ प्रकरण आली आहेत.फक्त मंत्रिपद द्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला होता. त्यामुळं मंत्रीपद  दिलं तर पक्ष संपेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी  दिला आहे. रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये गेले तरी भाजप का मंत्रीपद देईल? असे सवाल करत मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. 

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले ? 
संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय नाही, त्यांचा खून करण्यात आला त्याच्याच कार्यकर्त्यांकडून आणि त्याला मंत्रिपद देणार का? असा सवाल जरांगे यांनी केला. राष्ट्रवादी तर देणार नाही कारण देण्या अगोदर त्यांचे एवढे हाल आहेत तर दिल्यावर तर पूर्ण पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही यामुळे माझा दिवस चांगला जात नाही. घातपाताच्या सुपारी देऊन त्याने पुन्हा आमचेच लोक स्टॅन्ड केले आहेत? आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत. काळजी करु नको अजूनही सांगतो धन्यानं आमच्या नादी लागू नये असा इशारा जरांगेंनी दिला. 

आमचे लोक घातपात करुन पुन्हा उचकवून देऊ नये त्याने, तुझी एवढी प्रकरणं आहेत माझ्याकडे तरी मी अजून त्यात हात घातलेला नाही. तुझी लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहित आहे, तू बदनाम करत आहे मला हे देखील मला चांगलं माहित आहे. तुझे एवढी प्रकरण माझ्याकडे आली आहेत, मी अजून त्यात हात घातलेला नाही असे जरांगे म्हणाले. रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूर वरुन माझ्याकडे आली होती आणि त्यांनी सांगितलेलं एवढं भयानक मॅटर आहे, त्यामुळे तू सावध रहा असे जरांगे पाटील म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group