मनमाडच्या वंजारवाडी, अनकवाडे, धोटाणे खूर्द गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
मनमाडच्या वंजारवाडी, अनकवाडे, धोटाणे खूर्द गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
img
दैनिक भ्रमर
मनमाड (नैवेद्या बिदरी बिदरी) :- मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजामध्ये तीव्र रोष असून गावागावात फलक लावून राजकीय  पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत आहे.

मनमाडच्या वंजरवाडी, अनकवाडे, धोटाणे खूर्द गावातही राजकीय नेत्यांना गावात ' प्रवेश बंदी  फलक लावण्यात आले असून फलकावरील "जो समाजाला मानत नाही... त्याला समाज मानत नाही" या वाक्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.आरक्षणाच्या लढ्यात सोबत रहा अन्यथा जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्याने प्रवेश करू नये अशी भूमिका मराठा समाजाने मांडली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group