उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ; नेमकं प्रकरण काय?
उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ; नेमकं प्रकरण काय?
img
Dipali Ghadwaje
राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सगे सोयऱ्यांसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. हे उपोषण सुरु असतानाच मनोज जरांगेंच्या भावानं अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांना हाताशी धरत ही भेट त्यांनी घेतल्यानं आता या प्रकरणात काय उलथापालथ होणार अशी चर्चा रंगली होती.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एक निवेदनही दिल्याचे दिसले. मागण्या लवकरात लवकर मान्य केली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे.

काय आहेत मागण्या?

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे हे सध्या उपोषण करत आहेत मात्र दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांन समवेत घेऊन केली आहे..

शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याची घोषणा

मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे हे बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे मध्ये वास्तव्यात आहेत मनोज जरांगे.. मनोज जरांगे पाटलांनी गेल्या वर्षेभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील पुन्हा आपण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती मात्र आता त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे अशी मागणीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी केली आहे , यावेळी त्यांनी जर मागणी लवकरात लवकर जर मान्य नाही केली तर आपण शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचे देखील निवेदना मध्ये म्हटले आहे.भाऊसाहेब जरांगे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group