मोठी बातमी : राष्ट्रवादीचा बडा नेता मनोज जरांगेंच्या भेटीला ; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : राष्ट्रवादीचा बडा नेता मनोज जरांगेंच्या भेटीला ; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेले मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. अशातच आंतरवली सराटीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी  मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. बुधवारी (24 सप्टेंबर) मध्यरात्री राजेश टोप अचानक आंतरवली सराटीत पोहोचले. स्टेजवर मनोज जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले. दोघांमध्येही  काही वेळ चर्चाही झाली. पण नेमकी काय चर्चा  झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

दरम्यान त्यानंतर राजेश टोपेंनी मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर  काही वेळाने ते निघूनही गेले. पण त्यांच्या या  भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

नक्की वाचा >>>> संतापजनक घटना : नराधमाकडून 85 वर्षीय वृध्देवर जिन्यात फरफरटत नेत लैंगिक अत्याचार

नेमकं काय घडलं? 

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.  गेल्या दोन दिवसांपासून जरांगेंची प्रकृती खालावल्य़ामुळे राजेश टोपे यांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगेंनी उपचार घेतले.

दरम्यान,मनोज जरांगेयांच्या उपोषणाचा आज नववी दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. हे त्यांचे सहावे उपोषण आहेत. मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20  दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

नक्की वाचा >>>> राजकीय बातमी : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली” , नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
इतर बातम्या
Join Whatsapp Group