आंदोलकांचे सीएसएमटीत बस्तान ; CSMT स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी
आंदोलकांचे सीएसएमटीत बस्तान ; CSMT स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांची गर्दी
img
वैष्णवी सांगळे
ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आझाद मैदानावर सुरु असणाऱ्या या आंदोलनाचे पडसाद आता हळूहळू संपूर्ण मुंबईत उमटताना दिसत आहे.दिवसेंदिवस मराठा आंदोलकांचा उत्साह शिगेला पोहोचत असून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालय यांच्यासमोरील रस्त्यावर गर्दी वाढत चालली आहे.

सीएसएमटी स्थानकासह मुंबई महानगरपालिकेबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. आझाद मैदान, मुंबई महानगरपालिका आणि सीएसएमटी स्थानक या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.

तुमच्या खिशावर थेट परिणाम !आजपासून होणार 'हे' मोठे बदल

सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमल्याने लोकलने या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. CSMT स्थानकावर उतरल्यानंतर बाहेर पडताना तिकीट खिडकीच्या बाजूने बाहेर जावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांनी बस्तान मांडले असून घोषणाबाजी सुरू आहे. येथे मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने प्रवासी, नोकरदार वर्ग यांची गैरसोय होत आहे. तसेच गेले तीन दिवस सीएसएमटी जंक्शन परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत. याच ठिकाणी आंदोलकांचे जेवण, झोपणे होत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group