मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही सर्व मुलं १५ वर्षांखालील असून जवळपास त्याने 20 ते 22 मुलांनी डांबून ठेवलं. या भागात शूटिंग ऑडिशन चालू होत. दरम्यान आज त्याने मुलांना ओलीस ठेवून व्हिडिओद्वारे माहिती दिली.
व्हिडिओत त्याने काय म्हटलंय ?
माझं नाव रोहित आर्य. माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे, मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत.
मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. दि. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज / उद्या असेच होत आहे. आजपासून तीव्र उपोषण सुरु केले. आता पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं रोहित आर्यने म्हटलं आहे. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याचं सोल्युशन साठी मला संवाद साधायचा आहे, असं रोहित आर्यने म्हटलं आहे.
या सर्व प्रकारानंतर सध्या घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. सध्या रोहितला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.