मनोरंजन विश्वात खळबळ ! खंडणी घेताना प्रसिद्ध अभिनेत्रीची सून रंगेहाथ पकडली
मनोरंजन विश्वात खळबळ ! खंडणी घेताना प्रसिद्ध अभिनेत्रीची सून रंगेहाथ पकडली
img
वैष्णवी सांगळे
मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. गोरेगाव मधील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. कांदिवली इथली हेमलता पाटकर आणि सांताक्रूझ इथली अमरिना झवेरी या दोघींनी मिळून एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. याच खंडणीचा पहिला हप्ता दीड कोटी रुपये स्वीकारताना दोघींना मुंबई गुन्हे शाखेनं रंगेहाथ पकडलं

हेमलता पाटकर ही ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. 

प्रकरण काय ?
नोव्हेंबरमध्ये अंधेरी पश्चिम इथल्या एका हॉटेलमध्ये एका बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइट्सच्या वापरावरून हा वादा सुरू झाला होता. लेझर लाइट्सवरून हेमलता, अमरिना यांनी बिल्डरच्या मुलाशी वाद घातला होता. हा वाद नंतर इतका वाढला की त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. या वादानंतर २३ नोव्हेंबरला महिलांनी पोलीस ठाण्यात बिल्डरच्या मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. 

ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी त्यांनी बिल्डरकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. अखेर दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर निश्चित करण्यात आली. खंडणी आणि महिलांच्या सततच्या दबावाला वैतागून अखेर बिल्डरने मुंबई गुन्हे शाखेकडे धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी सापळा रचत हेमलता आणि अमरिना यांना खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडलं.


MUMBAI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group