दैनिक भ्रमर : दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वाद रस्त्यावरील राड्यापर्यंत आला. महापालिकेने ताडपत्री टाकून झाकलेला कबुतरखाना जैन समाजातील लोकांना बळजबरीने हटवला. या कबुतरखान्यावरील ताडपत्री या आंदोलकांनी फाडली. या ताडपत्रीसाठी लावण्यात आलेले बांबूही या आंदोलकांना पाडून बाजूला काढले. त्यानंतर या ठिकाणी या आंदोलकांनी चण्यांच्या गोणी रिकाम्या केल्या.
जैन धर्माप्रमाणे, पृथ्वीतलावर जसं माणसांना राहण्याचा हक्क आहे तसाच हक्क प्राण्यांना-पक्ष्यांना देखील आहे. मानवाला जसा अन्न वस्त्र आणि निवाऱ्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणेच प्राण्यांनाही अन्न आणि निवाऱ्याची गरज असते. जैन समाजामध्ये कबुतरांना का पवित्र स्थान आहे. यामागची परंपरा आणि मान्यता नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात.
जीवदया आणि अन्नदान परंपरा- जैन समाजात "जीवदया" ही एक अत्यंत पवित्र परंपरा आहे. या अंतर्गत पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवले जाते, "पंछीशाळा" (पक्ष्यांची दवाखाने) चालवले जातात.
जैन समाजात विशेष महत्त्व - जैन मंदिरांजवळ आणि धर्मशाळांमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याची परंपरा आहे.काही ठिकाणी कबुतरांच्या संगोपनासाठी विशेष "पक्षी निवास" बांधले जातात. जैन साधू-साध्वी कबुतरांप्रती विशेष प्रेम आणि जिव्हाळा दाखवतात. अनेक जैन मंदिर आणि ट्रस्ट 'कबुतरखाना' या नावाने संस्था चालवतात.
धार्मिक मान्यता : धार्मिक मान्यतेनुसार, भारतीय संस्कृतीत पशु-पक्ष्यांना अन्न, चारा खाऊ घालणं हे पुण्याचं काम मानण्यात आलं आहे. अनेक वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.
पितृ तृप्ती आणि मुक्ती : जैन धर्ममान्यतेनुसार, पक्ष्यांना विशेषत:कबुतरांना अन्न-पाणी खाऊ घातल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.
आध्यात्मिक दृष्टीकोन : प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार, कबुतरांना आध्यात्मिक संदेशवाहकही मानतात. फार पूर्वी कबुतरांच्या माध्यमातूनच पत्र व्यवहार चालायचा.