फसवणूक टाळण्यासाठी UPI च्या नियमांत बदल; लवकरच 'ही' सेवा बंद होणार
फसवणूक टाळण्यासाठी UPI च्या नियमांत बदल; लवकरच 'ही' सेवा बंद होणार
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : आपण आता डिजिटल जगात वावरत आहोत. त्यामुळे सर्व गोष्टी एका क्लिकच्या अंतरावर आहेत. डिजिटल व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होत आहे. यूपीआयच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करुन काही सेकंदांमध्ये पेमेंट करता येते. त्यामुळे सोबत पैसे ठेवण्याची गरज राहिलेली नाही. आता यूपीआयच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आता पीअर २ पीअर (P2P) म्हणजे कलेक्शन रिक्वेस्ट बंद होणार आहे. हे फीचर १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. या नवीन नियमांमुळे आता युजर्सची फसवणूक होणार नाही. याआधी असं कोणीही यूपीआय युजर्सला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवायचे त्यानंतर युजर्स ट्रान्झॅक्शन करायचे. यामुळे अनेकांच्या खिशाला फटका बसला आहे. ही फसवणूक टाळावी, यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

धक्कादायक ! स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन ; हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू

कनेक्शन रिक्वेस्ट किंवा पुल ट्रान्झॅक्शन हे यूपीआयचे एक फीचर आहे. यामध्ये युजर्स यूपीआयद्वारे कलेक्शन रिक्वेस्ट पाठवतात. म्हणजेच युजर्स दुसऱ्या ग्राहकांकडून पैसे मागण्याची परवानगी देते. अनेकदा हे फीचर वापरुन अनेकांची फसवणूकदेखील झाली आहे. अनेकजण याचा पैसे उकळण्यासाठी वापर करतात. म्हणूनच आता हे फीचर बंद करण्यात आले आहे. दरम्यान, फक्त व्यापारी १ ऑक्टोबरनंतर कलेक्शन रिक्वेस्ट सबमिट करणे सुरु ठेवू शकतात.

आजचे राशिभविष्य ! १४ ऑगस्ट २०२५, आजचा वार गुरुवार ; आनंदी वातावरण असेल की ताण वाढणार ? वाचा

व्यापारी ग्राहकाच्या यूपीआय अॅपवर कलेक्ट रिक्वेस्ट पाठवतात. युजर्सने मंजुली दिल्यानंतर यूपीआय पिन टाकल्यावर प्रोसेस केली जाते. यानंतर ग्राहकाच्या खात्यात पैसे कापले जातात.आता सर्व बँका आणि यूपीआय अॅप्सना P2P व्यव्हारांसाठी ट्रान्झॅक्शन करण्याच्या प्रक्रियेस मनाई केली आहे. एक यूपीआय युजर्स दुसऱ्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त २००० रुपये जमा करु शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group