UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून ब्लॉक होणार असे ट्रान्जेक्शन , जाणून घ्या सविस्तर माहिती
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ फेब्रुवारीपासून ब्लॉक होणार असे ट्रान्जेक्शन , जाणून घ्या सविस्तर माहिती
img
Dipali Ghadwaje
2016 मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. प्रत्येक दुकानात युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत आहे. याशिवाय परदेशातही युपीआय व्यवहार केले जात आहेत. श्रीलंका, भूतान, यूएई, मॉरिशस आणि फ्रान्समध्ये युपीआय व्यवहार होत आहेत.आता याच युपीआय संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार , 1 फेब्रुवारीपासून युपीआय ​​व्यवहाराच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये विशेष वर्णांना परवानगी नसेल. जर तुम्ही युपीआय ॲप्समध्ये अशा प्रकारचे ट्रान्जेक्शन आयडी वापरत असाल तर यापुढे व्यवहार होणार नाही. तुमचा व्यवहार केंद्रीय प्रणालीद्वारे नाकारला जाईल. 
 
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून विशेष वर्ण असलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. अल्फान्यूमेरिक वर्ण वापरून तयार केलेल्या आयडीद्वारेच व्यवहार करता येईल. नियमांच पालन न करणाऱ्या लोकांचे आयडी ब्लॉक केले जाणार आहेत. 
 
युपीआय ट्रान्झॅक्शन आयडी तयार करण्यासाठी फक्त इंग्रजी अक्षरे (A-Z) आणि संख्या (0-9) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टार, अंडरस्कोर, हायफन यासह इतर कोणतेही विशेष वर्ण नसावेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 
 
सर्व बँकांना त्यांच्या युपीआय आयडीमध्ये विशेष अक्षरे जोडलेले असे सर्व व्यवहार स्वीकारू नयेत, अशा सूचनाही केंद्रीय यंत्रणेने दिल्या आहेत .
 
UPI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group