बुधवारी नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय अमर आनंद पगारे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी मुंबईत तो पोहोचला पण त्याला साधी कल्पनाही नव्हती कि त्याची भेट मृत्यूशी होणार आहे.
अमर आनंद पगारे साधारण 11 च्या सुमारास मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नाका परिसरात पोहोचला. मरोळ नाका परिसरामध्ये यावेळी प्रेविलोन या विकासाकाकडून सुरू असलेला बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कूपर रुग्णालयात पाठवला आहे. यापूर्वी मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात बांधकाम इमारतीमधून सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडल्याने 19 वर्षीय संस्कृतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आता या दोन्ही घटनांमुळे बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था राम भरोसे आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. सध्या या घटनेचा एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.