नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन
नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन
img
वैष्णवी सांगळे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या विमानतळाची उभारणी चार टप्प्यात होणार आहे. या विमानतळावरुन प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतुकीसाठी दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्यापूर्वी विमानतळाच्या कामासंदर्भातील माहिती जाणून घेतली. 


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे येथे आहे. हा विमानतळ म्हणजे भारतातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे. यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी होईल अशी अपेक्षा आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो विस्तार यामुळे नवी मुंबईपर्यंत प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. 

मूळ मुंबईच्या जवळ असल्याने या भागात रिअल इस्टेटच्या किंमती आणखी वाढू शकतात. 1 कोटी किंवा त्याच्या आत ज्याचं घर खरेदीच बजेट आहे, त्यांच्यासाठी इथे चांगले पर्याय आहेत, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विकासकांच म्हणणं आहे. मोदींनी आज टर्मिनल 1 आणि रनवे 1 चं काम पूर्ण झालंय त्याचं उद्घाटन मोदी यांनी केलं. पुढच्या टप्प्यात विमानतळाचं काम कसं होणार याची माहितीही जाणून घेतली. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई जवळील दुसरं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळ ओळखलं जाईल. 

दरम्यान यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार आहे. पहिल्या टर्मिनलच्या उद्घाटनाला  7 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी अदानी समुह आणि सिडको यांच्याकडून संयुक्तपणे उभारलं जात आहे. 

अदानी समुहाकडे या विमानतळाची 74 टक्के मालकी आहे. तर, सिडकोकडे 26 टक्के मालकी आहे. अदानी समुहानं 2021 नं विमानतळ निर्माणामध्ये प्रवेश केला. पुढचा टप्पा दोन्ही संस्थांमार्फत होणार आहे. 2018 ला भूमिपूजन झालं त्यानंतर जमीन अधिग्रहण करुन विमानतळ उभारणं मोठं आव्हान होतं. ते काम पूर्ण झालं आहे. टर्मिनल 1 पूर्ण झाल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करु शकतात. 


MUMBAI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group