आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू; आता ती घरात एकटीच राहिली
आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू; आता ती घरात एकटीच राहिली
img
दैनिक भ्रमर
२९ वर्षीय इशांत सिंह हा मेरठ येथील तरुण. तो मेरठ जिल्हाधिकारी  कार्यालयात  इंग्रजी रेकॉर्ड विभागात क्लर्क म्हणून काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला नोकरी मिळाली. त्याच्या वडिलांचंही आधीच निधन झालं होतं. पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होता. 

१२ तासांत दोनदा हार्ट अटॅक 
रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इशांतच्या छातीत खूप दुखू लागलं. कुटुंब आणि ओळखीच्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे प्राथमिक तपासणी, ईसीजी आणि काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्याला काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठवलं. 

सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इशांत नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये गेला. त्यानंतर अचानक त्याला पुन्हा छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो तिथेच पडला. पडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी ताबडतोब बाथरूमकडे धावली आणि दार वाजवलं, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरून तिने जवळच्या शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि इशांतला बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. धक्कादायक म्हणजे त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला होता. इशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तो एकुलता एक होता. आता तोही जग सोडून गेल्याने पत्नी एकटीच राहिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group