तुम्हांला मुस्कान आठवतेय ? हो, तीच उत्तर प्रदेशातील मेरठ येथील मुस्कान जिने स्वतःच्या नवऱ्याची प्रियकराच्या मदतीने हत्या करत नंतर त्याला नीळ्या ड्रममध्ये टाकले होते. हे प्रकरण आता संपूर्ण देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते.
सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर परिसरात 3 मार्च 2025 च्या रात्री सौरभची क्रूरपणे हत्या केली होती. सौरभला झोपेची गोळी देण्यात आली. त्यानंतर छातीत वार करून त्याला ठार केले. मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट टाकून बंद करण्यात आले. 18 मार्च रोजी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
सध्या मुस्कान आणि साहिल मेरठ जिल्हा कारागृहात आहेत आणि खटला जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मुस्कानला अटक होताच तिची गर्भावस्था उघड झाली. २४ नोव्हेंबर रोजी मेडिकल कॉलेजच्या वॉर्डात तिने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव राधा ठेवण्यात आले आहे. सध्या आई आणि मुलगी दोघीही कारागृहातच आहेत. इतर महिला कैद्यांनीही राधाची काळजी घेतल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे. आणि याच राधाचा चेहरा प्रियकर साहिलला दाखवण्याची इच्छा मुस्कानने व्यक्त केली.
मुस्कानने कारागृह प्रशासनाला विनंती केली होती की, तिची मुलगी राधा हिला साहिलला भेटू द्यावे आणि तिचा चेहरा त्याला दाखवावा. मात्र कारागृह अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, “तुरुंग नियमांनुसार अशा भेटीस परवानगी नाही.” तथापि, न्यायालयीन सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुस्कान मुलीला सोबत आणू शकते, आणि त्या वेळी साहिलला राधाचा चेहरा पाहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावलाय.