सर्व हिंदूंना पाहून घेईल, योगी सरकार गेल्यानंतर हिंदूंना हिशोब द्यावा लागेल; छांगुर बाबाच्या गुंडाची धमकी
सर्व हिंदूंना पाहून घेईल, योगी सरकार गेल्यानंतर हिंदूंना हिशोब द्यावा लागेल; छांगुर बाबाच्या गुंडाची धमकी
img
दैनिक भ्रमर
हिंदू मुलींना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या छांगुर बाबाचे रोज नवेनवे कारनामे समोर येत आहे. आता छांगुरच्या गुंडानीही धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. मधपूर गावाचा रहिवासी असलेला जलालुद्दीन उर्फ छांगुर पीर हरजीत कश्यपवर जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव आणत असल्याच्या आरोपाने . पोलिसांनी संबंधित प्रकरणात कारवाई केली होती.

मात्र या प्रकारणात हरजीत कश्यपला छांगुरचे गुंड जीवे मारण्याची धमकी देत आहेत. पीडित हरजीत कश्यपने या प्रकरणी पोलिसांत एफआयआर नोंदवली आहे. एफआयआरनुसार, छांगुरच्या गुंडांनी 'सर्व हिंदूंना पाहून घेण्याची' धमकी दिली आहे. 'योगी सरकार गेल्यानंतर हिंदूंना हिशेब द्यावा लागेल,' असेही ते म्हणाले.

ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील आहे. हरजीत कश्यप कधीकाळी छांगुरकडेच काम करत होता. छांगुरच्या प्रभावाखाली आणि दबावामुळे त्याने धर्म परिवर्तन केले. छांगुरच्या या धर्मांतरण मॉड्यूलचे आणि त्याच्या वाईट हेतूंचे एकापाठोपाठ एक खुलासे झाल्यानंतर, गेल्या 3 जुलै रोजी त्याने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. त्याने पोलिसांत छांगुरविरुद्ध जबाबही दिला, त्यानंतर त्याच्या गुंडांनी त्याला 'परिणाम भोगण्याची' धमकी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group