माता न तू वैरिणी ! नवऱ्यासोबत भांडल्यावर बायकोचे दीड वर्षाच्या चिमुकल्यासोबत भयंकर कृत्य
माता न तू वैरिणी ! नवऱ्यासोबत भांडल्यावर बायकोचे दीड वर्षाच्या चिमुकल्यासोबत भयंकर कृत्य
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. एक आईने तिच्या दीड वर्षाच्या चिमुकल्यास मारल्याची धक्कादायक घटना याठिकाणी समोर आली आहे. पतीशी झालेल्या भांडणात तिने रागाच्या भरात तिच्या दीड वर्षाच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून फेकून दिलं. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. माता न तू वैरिणी याच वाक्याची प्रचिती या घटनेत आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधील नगर कोतवाली परिसरातील मोहल्ला मजिदपुरा येथे राहणाऱ्या वसीमचं ५ वर्षांपूर्वी बिहारमधील रहिवासी शबानाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर शबानाला दोन मुलं झाली. वसीमचा आरोप आहे की, त्याची पत्नी घरात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असे. भांडणाच्या वेळी तिने रागावून दीड वर्षाचा मुलगा अहदला तिच्या मांडीवर उचललं आणि दुमजली घराच्या छतावरून खाली फेकलं. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

खळबळजनक ! भाजयुमो पदाधिकाऱ्यासह चुलत भावाचा खून, परिसरात खळबळ

मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group