महिलांवर अत्याचाराच्या बातम्या रोजच समोर येत असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने लोकांची मानसिकता किती विकृत झाली आहे हेच दिसून येत. सहारनपूरमध्ये एका नराधमाने गायीवर दुष्कृत्य केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या संबंधित व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना देताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीचा शोध घेतला.
राम बहादूर असे आरोपीचे नाव आहे. तो सदर पोलीस स्टेशन परिसरातील नवादा रोड येथील रहिवासी आहे. त्यानं सहारनपूरमध्ये गायीसोबत घृणास्पद कृत्य केलं. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर राम बहादूर एका गायीसोबत दुष्कृत्य करत असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होऊ लागली.
पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. तपासात आरोपीचे नाव राम बहादूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो नवादा रोड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. आरोपीने पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत राम बहादूरवर गोळीबार केला. गोळीबारादरम्यान, त्याच्या पायात गोळी लागली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. रक्त वाहू लागल्यानं तो जमिनीवर कोसळला. पोलिसांनी राम बहादूरला अटक केली असून, त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास करून आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसेही जप्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.