आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, रात्री छातीत दुखू लागल्यानंतर अॅसिडिटी असल्याचे समजल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार , गुजरातमधील नवासारी येथील तपोवन आश्रम शाळेत मध्य प्रदेशमधील मेह शाह शिकण्यासाठी आला होता. रात्री एक वाजता मेह याच्या छातीत दुखू लागलं, त्यावेळी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याकडे गेला. पण त्या कर्मचाऱ्याला मुलाला अॅसिडिटी झाल्याचे वाटले.
त्याला प्रथमोपचार दिला, पण त्रास काही थांबवत नव्हता. रात्रभर छातीत असह्य वेदना होत असलेल्याने मेघला रूग्णलायत दाखल केले, पण सकाळी रुग्णालयात निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर, आश्रम शाळा व्यवस्थापनाने वसतिगृह सहाय्यक हर्षद राठवा यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले आहे.
२४ मे २०२५ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मेघ शाह याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवल्या. त्याने याबाबत वसतिगृहातील सहाय्यकाला माहिती दिली. मात्र, सहाय्यकाने ही वेदना किरकोळ समजून अॅसिडिटी झाल्याचा अंदाज बांधला आणि त्याला औषध देऊन झोपण्यास सांगितले. दुर्दैवाने, काही वेळातच मेघची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक अंदाजानुसार, मेघला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आहे. मेघ हा नवसारी जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील मुलगा होता. तो तपोवन आश्रमशाळेत शिक्षण घेत होता आणि त्याच्या अभ्यासातील प्रगतीमुळे शिक्षकांमध्येही त्याच्याबद्दल कौतुक होते. या घटनेमुळे मेघच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.