करमाळा तालुक्यातील केम येथील तळेकर वस्ती नंबर १ या शाळेमध्ये कार्यरत मुख्याध्यापक कांतीलाल गोविंद काकडे (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कांतीलाल काकडे असलेले त्यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील निंभोरे असून, केम येथील तळेकर वस्ती नंबर १ या शाळेत ते मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते.
सकाळी केम येथील केंद्र शाळेतील मीटिंग आटोपून कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी ते निघाले असता रस्त्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
निंभोरे येथील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.