देशात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश, डॉक्टराच्या घरातून ३०० किलो RDX अन्...
देशात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश, डॉक्टराच्या घरातून ३०० किलो RDX अन्...
img
वैष्णवी सांगळे
एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशात एक मोठ्या घातपाताचा कट उधळलण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणा राज्यातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकत ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केलाय.



यापूर्वी गुजरातमध्ये एरंडीच्या बियांपासून विष तयार करत देशात मोठा कट रचला होता. पण गुजरात एटीएसने तीन जणांना ताब्यात घेत मोठा डाव उधळला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हरियाणामधून हे मोठं प्रकरण समोर आलेय.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फरीदाबाद जिल्ह्यात छापा टाकला होता. छाप्यादरम्यान, मुजाहिल शकील असे एका काश्मिरी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. रविवारी, डॉक्टरच्या माहितीवरून, जम्मू पोलिसांनी ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ८४ काडतुसे आणि पाच लिटर रसायने जप्त केली.

 जप्त केलेल्या एकूण वस्तूंची संख्या ४८ असल्याचा अंदाज आहे. देशात मोठा दहशतवादी कट उधळला गेला असून पोलिस चौकशी सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group