धक्कादायक ! भारतात दहशतवादी हल्ल्यानंतर आणि 26 पर्यटकांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांकडून सेलिब्रेशन
धक्कादायक ! भारतात दहशतवादी हल्ल्यानंतर आणि 26 पर्यटकांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांकडून सेलिब्रेशन
img
दैनिक भ्रमर
२२ एप्रिल रोजी फिरायला आलेल्या निरपराध, निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, दहशतावाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि 26 पुरूषांचा बळी घेतला. या हल्ल्याला आता जवळपास 3 महिने होत आले असले तरी याप्रकरणात अजूनही रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे की, पर्यटकांना मारल्यानंतर दहशतवाद्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या एका प्रमुख प्रत्यक्षदर्शीने हे सत्य तपासकर्त्यांसमोर उघड केले आहे. 

एका प्रत्यक्षदर्शीने तपासकर्त्यांना सांगितले की, 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांना ठार मारल्यानंतर ‘सेलिब्रेशन’ म्हणून बंदूकधाऱ्यांनी हवेत चार राउंड फायर करताना त्याने पाहिलं. जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोधून काढलेल्या या ‘स्टार प्रोटेक्टेड साक्षीदार’चा हल्ल्याच्या काही
मिनिटांनंतर बैसरन व्हॅलीमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांशी सामना झाल्याचेही उघड झाले.

हवेत गोळीबार करत सेलिब्रेशन
26 नागरिकांना मारल्यानंतर बैसरन सोडत असताना बंदूकधारी दहशतवाद्यांनी त्याला थांबवलं, असं त्या साक्षीदाराने तपासकर्त्यांना सांगितले. ” एवढंच नव्हे तर त्यांनी (दहशतवादी) त्याला कलमा पढण्यासही सांगण्यात आलं आणि जेव्हा तो त्यांच्या स्थानिक भाषेत बोलू लागला तेव्हा त्या दहशतवाद्यांनी त्याला सोडून दिलं. हल्ल्यानंतर त्यांनी आनंदोत्सवात गोळीबार सुरू केला, हवेत चार राउंड फायर करण्यात आले” असेही साक्षीदाराने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितलं.

त्या साक्षीदाराच्या जबाबाच्या आधारे, तपास पथकाने घटनास्थळावरून वापरण्यात आलेली चार काडतुसं जप्त केली. त्या साक्षीदाराने तेथे दहशतवादी सहाय्यक परवेझ आणि बशीर यांना एका टेकडीजवळ उभे राहून हल्लेखोरांच्या सामानाची देखरेख करताना पाहिले होते, जे बंदूकधारींनी अखेर त्यांच्याकडून हिसकावून घेतले, अशी माहिती तपासयंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे समोर आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group