गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खानची कमाई तगडी आहे. 1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंड गौरीशी लग्नं केलं. 1997 साली आर्यनचा तर 2000 साली सुहानाचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तब्बल 13 वर्षांनी शाहरुख खान आणि गौरी हे सरोगसी द्वारे आई-वडील बनले. त्या मुलाचे नाव आहे अबराम.
अबराम ज्या शाळेत शिकतो त्या शाळेची वार्षिक फी ऐकून सर्वसामान्यांना धक्काच बसेल. अबराम हा मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतो. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची भारतातील सर्वोच्च शाळांमधील एक अशी गणना केली जाते.
2003 साली नीता अंबानी यांनी शाळेची स्थापन केली होती. 1,30,000 चौरस फुटांत बांधलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा आणि शिक्षण सुविधा आहेत. अनेक सेलेब्रिटी किड्स या शाळेत शिकतात.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक इयत्तेनुसार बदलते. रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतचे मासिक शुल्क सुमारे 1.70 लाख रुपये आहे. 8 वी ते 10 वी पर्यंतची दर महिन्याची फी ही 4.40 लाख रुपये आहे. तर 11वी आणि 12वी फी सुमारे 9.65 लाख रुपये आहे. यानुसार, अब्रामची सध्याची वार्षिक फी सुमारे 20.40 लाख रुपये आहे.