अभिनेत्री दीपिका पदुकोणचे जगभरात लाखो चाहते आहे. दीपिकाला भेटावं तिच्याशी बोलावं हे तिच्या चाहत्यांना नेहमीच वाटत असतं. पण ते तितकं सोपं नाही. पण दीपिकासोबत तिच्या चाहत्यांसाठी आता सोप्प झालं आहे. तंत्रज्ञानामुळे हे अगदी सहज शक्य आणि सोपं झालं आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी मेटाच्या 'मेटा एआय' (Meta AI) व्हर्च्युअल असिस्टंटला आवाज देणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. एआय असिस्टंटला आता दीपिकाच्या आवाजात ऐकण्याची संधी भारतीय युजर्सना मिळणार आहे. ज्यात रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे.
व्हिडीओ शेअर करत मेटाने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, भारतातील युजर्स आता भारतीय इंग्रजीमध्ये दीपिकाच्या आवाजात मेटा एआयशी बोलू शकतील. फक्त भारतातीलच नाही तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडमधील एआय असिस्टंटचा वापर करणारे लाखो लोक दीपिकाच्या आवाजात एआयकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतील.
तंत्रज्ञानाच्या या माध्यमातून दीपिका कायम चाहत्यांशी जोडलेली राहणार आहे. दीपिका ही एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत हॉलिवूड स्टार अवक्वाफिना आणि जुडी डेंच यांच्या नावांचा समावेश आहे. दीपिकासाठी, हे पाऊल तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.