'पार्ले-जी'ने बदलला आयकॉनिक मुलीचा फोटो! बिस्किटांच्या पाकिटावरील नवीन चेहरा कोण?
'पार्ले-जी'ने बदलला आयकॉनिक मुलीचा फोटो! बिस्किटांच्या पाकिटावरील नवीन चेहरा कोण?
img
Dipali Ghadwaje
पार्ले-जी हे बिस्किट भारतात खूपच लोकप्रिय आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच चहासोबत पारले-जी बिस्किट खाण्यास आवडते. पार्ले-जी बिस्कीटाची आणखी एक खासियत म्हणजे बिस्किटच्या कव्हरवर असलेल्या चिमुरड्या मुलीचा फोटो. पार्ले ग्लुको बिस्किट’ हे आपल्या देशात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या बिस्किटांपैकी एक आहे. अगदी बक्कळ पैसे असलेल्या श्रीमंत लोकांपासून पार फुटपाथवर राहणाऱ्या गरीबांपर्यंत सर्व स्थरांमधील लोकं पार्ले बिस्किट आवडीनं खातात. त्यामुळे पार्ले बिस्किटाचा पुडा जर कोणी स्वप्नातही दाखवला तरी देखील आपण ओळखू शकतो.

पण आश्चर्याची बाब म्हणजे पार्लेच्या पुड्यावर दिणारी मुलगी गायब झालीये. आता पार्लेजीच्या कव्हरवर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो छापण्यात आला आहे. सोशल मीडियावर तशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतंच. पार्लेजीने हा बदल नेमका का केलाय? जाणून घ्या 

सोशल मीडियावर पार्लेजी कंपनीकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये बिस्कीटाच्या कव्हर फोटोवर पार्ले-जी गर्लऐवजी कंटेट क्रिएटर जेरवान जे बुन्शाह ह्याचा फोटो छापण्यात आला आहे. सुरुवातीला ही पोस्ट पाहून सारेच चकित झाले आहेत. पण नेमकं असं काय घडलं हे जाणून घेऊयात. 

बन्शाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्याने त्याच्या फॉलोअर्सना एक प्रश्न विचारला आहे. त्याने व्हिडिओत विचारलं आहे की, जर तुम्ही पार्ले जीच्या मालकांना भेटाल तर त्यांना तुम्ही पार्ले-सर, मिस्टर पार्ले किंवा पार्ले-जी या नावाने हाक माराल का? या व्हिडिओत बुन्शाहने चेहऱ्यावरही गोंधळलेले भाव आणले आहेत. तर, बॅकग्राउंडमध्ये ऐ जी ओ जी हे गाणं ठेवण्यात आलं आहे. 

तीन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओवर इन्स्टाग्राम युजर्सकडून मोठ्या प्रामाणात प्रतिक्रिया येत आहेत. तर बुन्शाहच्या या प्रश्नाचे उत्तर चक्क पार्ले-जीनेच दिलं आहे. बुन्शाहच्या व्हिडिओवर पार्ले-जीने कमेंट करत म्हटलं आहे की, बुन्शाह तुम्ही आम्हाला ओजी म्हणून शकता. त्यानंतर, पार्ले-जीच्या अधिकृत अकाउंटवरुनही बुन्शाहला उत्तर देण्यात आलं आहे. पार्ले-जीच्या कव्हरवर छोट्या चिमुरडीच्या ऐवजी बुन्शाहचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच, ही पोस्ट शेअर देखील करण्यात आली आहे.

या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे की, पार्ले-जीच्या मालकांना काय हाक माराल यांचा विचार करत असतानाच तुम्ही एक कप चहासोबत तुमच्या आवडीच्या बिस्किटाचा आनंद घेऊ शकता? याबाबत काय विचार आहे तुमचा @bunshah, असा उलटा प्रश्नच पार्ले-जीने केला आहे.

पार्ले-जीची ही क्रिएटिव्ह पोस्ट बुन्शाहला देखील खूपच आवडली आहे. त्यांनी पार्लेच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, लहान असताना मी हे बिस्किट खाताना हाच विचार करायचो की आता मी जिनियस होणार, असं बुन्शाहने म्हटलं आहे. इंटरनेटवर युजर्सनेही या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याला लकी म्हटलं आहे. तर, एकाने म्हटलं आहे की आता आम्हाला आमच्या पार्ले-जी बिस्किटच्या पॅकेटवर बुन्शाहचाच फोटो हवाय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group