Google Pay बाबत मोठी अपडेट!  गुगल पे होणार बंद
Google Pay बाबत मोठी अपडेट! गुगल पे होणार बंद
img
Dipali Ghadwaje
गुगल पे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण आता कंपनीने या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुने गुगल ॲप बंद करणार आहे.

Google ने घोषणा केली आहे की, ते 4 जून 2024 रोजी अमेरिकेत Google Pay ॲप बंद करणार आहे. Google Wallet प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून Google ची पेमेंट सुविधा सुलभ करणे हा त्यांचा उद्देश आहे.

म्हणजे आता याचे जुने व्हर्जन तेथील मोबाईलमध्ये चालणार नाही. हे ॲप बंद होण्यासोबतच गुगलने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केले आहे. त्याच्या मदतीनेच तुम्ही अमेरिकेत पैसे पाठवू किंवा मागवू शकता. अमेरिकेत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

Android होमस्क्रीनवर दिसणारे 'GPay' ॲप ही जुनी आवृत्ती आहे जी पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरली जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीने हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे.

कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली आहे की Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, स्टँडअलोन Google Pay ॲपची अमेरिकन व्हर्जन 4 जून 2024 पासून वापरासाठी उपलब्ध होणार नाही. Google Pay ॲप युनायटेड स्टेट्समध्ये बंद केले जाईल. मात्र Google Pay ॲप भारत आणि सिंगापूर सारख्या इतर बाजारपेठांमध्ये सुरळीतपणे चालू राहील. 

गुगलने ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, भारत आणि सिंगापूरमध्ये गुगल पे ॲप वापरणाऱ्या लाखो लोकांमध्ये काहीही बदल होणार नाही. गुगल पे बंद झाल्यानंतर अमेरिकेतील युजर्ससाठी येणारा एक बदल म्हणजे युजर्स यापुढे Google Pay ॲपद्वारे इतर व्यक्तींकडून पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group