फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हे आजकाल सर्वांचे आवडते ॲप बनलंय. ॲपचे रील आणि स्टोरी फीचर सर्वाधिक आश्चर्यकारक आहेत. यामुळे लाखो युझर्सला त्याचं वेड लागलंय.
मेटा आता या स्टोरी सेक्शनसाठी एक विशेष अपडेट आणत आहे. याचे नाव आहे Unseen Story Highlights कंपनी सध्या या नवीन फीचरची चाचणी करत आहे.
स्टोरी हायलाइट्स नावावरून असं वाटतं की, या फीचरच्या मदतीने युजर्सला अशा लोकांच्या स्टोरी पाहायला मिळतील ज्यांना तुमच्याकडून सुटल्या असतील.
हे स्टोरी हायलाइट्स युझर्सच्या स्टोरी सेक्शनच्या शेवटी दिसून येईल. जे ॲपच्या शीर्षस्थानी वेगळ्या सेक्शनमध्ये दिसेल. ज्यामुळे लोकांना स्टोरीजमधून कनेक्ट करता येईल. तसेच स्टोरी ट्रेच्या शेवटी अलीकडील हायलाइट्स शेअर करत असतो .
आता इंस्टाग्राम स्पॉसर्ड पोस्ट आणि रॅडम रिल्सने भरलेले आहे, यात हे नवीन फीचर बरेच उपयुक्त ठरू शकते. कारण ते युझर्सच्या मित्रांची नवी अपडेट देण्याचा एक जलद मार्ग उपलब्ध करून देईल. कंपनीने असेही म्हटलं की, या फीचरच्या मदतीने युझर्स गेल्या आठवड्यातील न पाहिलेले स्टोरी सुद्धा हायलाइट्समध्ये पाहू शकतील.
पण हे तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही इस्टाग्रामवरील सर्वच इस्टास्टोरीज पाहिल्या असतील. म्हणजेच जर तुम्ही अनेकांना फॉलो करत असला आणि इस्टास्टोरीज पूर्ण पाहत नसाल तर तुम्हाला सुटलेल्या स्टोरीज हायलाइट्समध्ये दिसणार नाहीत.