मुंबई : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि ब्रिटिश-भारतीय गायिका जस्मिन वालिया हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांचे ब्रेक अप झाल्याची चर्चा असून याच कारणामुळे हे दोघे चर्चेत आलेत या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीचा अंत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिक पांड्या किंवा जस्मिन या दोघांनीही कधीही त्यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबद्दल अधिकृतरित्या भाष्य केले नव्हते. मात्र हे दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाल्याची चर्चा सातत्याने ऐकू येत होती. मात्र आता या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांच्यातील ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. जस्मिनच्या फॉलोअर्सच्या यादीत हार्दिकचे नाव शोधल्यास ते दिसत नाही आणि हार्दिकच्या प्रोफाइलमध्येही जस्मिनचे नाव दिसत नाही.
यामुळे या दोघांच्या चाहत्यांना असे वाटू लागले आहे की या दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले असून यामुळे दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असावा. जाहीररित्या या दोघांनी आपल्या नात्याबद्दल किंवा त्यात आलेल्या दुराव्याबद्दल बोलणे टाळले आहे.
हार्दिक पांड्याचे यापूर्वी मॉडेल नताशा स्टँकोविक सोबत लग्न झाले होते. गेल्या वर्षी या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य ठेवण्यात आले आहे. घटस्फोट झाला असला तरी या दोघांनी मुलाचे सह पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केले होते आणि आपण घटस्फोट घेत असल्याचे कळवले होते.