क्रिकेट प्रेमींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी ! हार्दिक पंड्या
क्रिकेट प्रेमींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी ! हार्दिक पंड्या "या" स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
img
Dipali Ghadwaje
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला २१ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे. या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाहीये.

काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत हार्दिक पंड्या खेळताना दिसून आला होता. याच स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. मात्र आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये.

काय आहे कारण? 

हार्दिक पंड्याने वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या काही सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही सामने झाल्यानंतर हार्दिक पंड्या या स्पर्धेत कमबॅक करेल. हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे त्याने मैदानात उतरणं गरजेचं आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group