टी20 वर्ल्डकप 2026 : हार्दिक पांड्याला मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात पडणार
टी20 वर्ल्डकप 2026 : हार्दिक पांड्याला मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात पडणार
img
वैष्णवी सांगळे
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारताने या जेतेपदासह काही विक्रम रचले. सलग दोनदा जेतेपद, तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणारा पहिला संघ तसेच यजमानपद असताना पहिले जेतेपद मिळण्याचा मान असे अनेक विक्रम नावावर केले. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण होतं. आता चार दिवस झाले असून जेतेपदाचं उत्साह ओसरत चालला आहे. खेळाडूही आपआपल्या घरी परतले आहेत. पण असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्या अडचणीत आला आहे. त्याच्याविरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा, तर गळ्यात विश्वचषकाचं मेडल असून यावेळी तो महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपला होता. यावरुन सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात होता. आता सदर प्रकरणावरुन हार्दिक पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मैदानावर भारतीय ध्वजात गुंडाळून महिका शर्मासोबत सेलिब्रेशन करणं हार्दिक पांड्याला महागात पडलं आहे. पुणे येथील वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात वाजिद खान यांचा एफआयआर स्वीकारण्यात आला आहे. 

विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याच्या मैत्रिणीसोबत भारतीय ध्वजात गुंडाळून नाच केला आणि नंतर झोपला, ज्यामुळे भारतीय ध्वजाचा अपमान झाला, असा दावा वाजिद खान यांनी केला आहे.विश्वचषक जिंकल्यानंतर महिका हार्दिक पांड्यासोबत मैदानात दिसली. हार्दिक पांड्या आणि महिका दोघंचं मैदानात फिरत होते, नाचत होते. महिकाने यावेळी हार्दिक पांड्याला अनेकदा मिठी मारली. तसेच हार्दिकच्या गालावर किसही केली. महिकाने जेव्हा हार्दिक पांड्याला किस केली, त्यावेळी मैदानातील ग्राऊंड स्टाफ दोघांकडे बघत बसले. तसेच हार्दिक आणि महिकाचे आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत. 

या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा, तर गळ्यात विश्वचषकाचं मेडल असून यावेळी तो महिकासोबत मैदानातील बक्षीस वितरणासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजवर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि महिकाच्या या कृत्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group