मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक ;   काय आहे नेमकं प्रकरण?
मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक ; काय आहे नेमकं प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला अटक करण्यात आली आहे. हार्दिकच्या सावत्र भावावर 4.3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?
2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. हार्दिक आणि कृणाल दोघांकडे 40% शेअर्स तर वैभवकडे उर्वरित 20% शेअर्स होते. पण हार्दिक आणि कृणाल पांड्याला न कळवता त्यांच्या सावत्र भावाने व्यवसायात दुसरी फर्म स्थापन केली. ज्यामुळे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

त्यामुळे त्याला पैशांचा गैरवापर तसेच करारातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group