इलॉन मस्कने दिली आनंदाची बातमी; आता 'एक्स'चे प्रीमियम प्लस फीचर्स मिळणार अगदी मोफत
इलॉन मस्कने दिली आनंदाची बातमी; आता 'एक्स'चे प्रीमियम प्लस फीचर्स मिळणार अगदी मोफत
img
Dipali Ghadwaje
एक्स (ट्विटर) अ‍ॅप विकत घेतल्यानंतर इलॉन मस्कने कित्येक मोठे बदल केले होते. यातीलच एक बदल म्हणजे एक्सवर प्रीमियम आणि प्रीमियम प्लस असे सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करणे. या प्लॅन्समध्ये यूजर्सना कित्येक फीचर्स देण्यात येतात. त्यामुळे यांची किंमतही भरपूर आहे. मात्र आता हे प्लॅन्स यूजर्सना अगदी मोफत मिळू शकतात, असं इलॉन मस्कने घोषित केलं आहे.

एक्सच्या प्रीमियम प्लस प्लॅनमध्ये यूजर्सना कित्येक भन्नाट फीचर्स मिळतात. यामध्ये एक्सवर जाहिराती दिसत नाहीत. तसंच, दोन तासांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा, रेव्हेन्यू शेअरिंग, रिप्लाय प्रायोरिटी अशा फीचर्सचाही यात समावेश आहे. एवढंच नाही, तर इलॉन मस्कचा एआय चॅटबॉट 'ग्रॉक'चा अ‍ॅक्सेसही X Premium+ यूजर्सना लवकरच मिळणार आहे.

एक्सच्या बेसिक प्लॅनची किंमत 244 रुपये प्रति महिना किंवा 2,590 रुपये प्रति वर्ष एवढी आहे. प्रीमियम प्लॅनची किंमत 650 रुपये प्रति महिना एवढी आहे. तर प्रीमियम प्लस प्लॅनची किंमत 1,300 रुपये प्रति महिना किंवा वर्षाला 13,600 रुपये एवढी आहे. इलॉनने आता हे प्लॅन्स यूजर्सना मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी एक अटही लागू केली आहे.  

 काय आहे अट?
इलॉन मस्कने आपल्या एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. मस्कने सांगितलं, की 2,500 व्हेरिफाईड सबस्क्राईबर्स असणाऱ्या अकाउंट्सना प्रीमियम फीचर्स मोफत मिळतील. तसंच 5,000 पेक्षा अधिक व्हेरिफाईड सबस्क्राईबर्स असणाऱ्या अकाउंट्सना प्रीमियम प्लस फीचर्स मोफत मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला हे फीचर्स मोफत मिळतील की नाही हे तुमच्या सबस्क्राईबर्सवर अवलंबून असणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group