जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी XChat नावाने नवीन मेसेजिंग सर्व्हिस लॉन्च केली आहे. याबाबात त्यांनी X वर माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन मेसेजिंग सर्व्हिसमध्ये यूजर्सला एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरची देखील आवश्यकता नसणार आहे.
एलोन मस्क यांनी X वर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये XChat च्या फीचरबद्दल माहिती देण्यात आली आहे. XChat मध्ये बिटकॉइन लेव्हल एन्क्रिप्शन वापरले गेले असल्याची देखील माहिती एलोन मस्क यांनी दिली आहे. X प्लॅटफॉर्मला एव्हरीथिंग ॲपमध्ये बदलण्यासाठी एलोन मस्क गेल्या अनेक दिवसांपासून काम करत होते. त्यामुळे त्यांनी आता XChat लॉन्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.
एलन मस्क X ला चीनच्या WeChat सारखे बनवण्यासाठी काम करत आहे. चीनमध्ये युजर्सला WeChat या ॲपच्या माध्यमातून अनेक सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये मेसेजिंग, पेमेंट, मीडिया आणि डेटिंग सारख्या सुविधांचा समावेश आहे.
XChat वर मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज नाही
एलोन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार XChat वापरण्यासाठी युजर्सला मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही मोबईल नंबर शेअर न करता मेसेजिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि फाइल शेअरिंग करु शकणार आहे. सध्या XChat वर टेस्टिंग करण्यात येत आहे. पुढील काही दिवसात सर्व युजर्ससाठी ते रिलीज करण्यात येणार असल्याची देखील माहिती एलोन मस्क यांनी दिली आहे.
काय असणार XChat फीचर्स
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: युजर्सची सेफ्टी लक्षात घेत यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर्स मिळणार आहे. तसेच यामध्ये बिटकॉइन स्टाईल एन्क्रिप्शन देण्यात येणार आहे. ज्यामुळे हॅकर्स मेसेज हॅक करु शकत नाही.
Disappearing Messages : तसेच यामध्ये Disappearing Messages चा पर्याय देखील देण्यात येणार आहे. ज्यामुळे युजर्सला गोपनीयता राखण्यात मदत होणार आहे.
ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सुविधा: XChat मध्ये युजर्सला ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा देखील मिळणार आहे. यासाठी युजर्सला मोबाईल नंबर वापरण्याची आवश्यकता नसणार आहे.